S M L

केदार शिंदे मालिका, हिंदी सिनेमा निर्मितीत बिझी

9 एप्रिलभाग्यश्री वंजारी दिग्दर्शक केदार शिंदे तब्बल चार वर्षानंतर मालिकांची निर्मिती करतोय. 'वरचा क्लास' या मालिकेची निर्मिती आणि संकल्पना केदारची आहे. तर त्याचं दिग्दर्शन केलंय निमिष दत्त यानं केलंय. निमिषचं हे पहिलंवहिलं दिग्दर्शन असलं तरी यापूर्वी त्यानं केदारच्याच अनेक सिनेमांसाठी त्याला असिस्ट केलं आहे. सध्याच्या मालिकांमधला खोटेपणा आणि भडकपणा पाहता काहीतरी साधं सोप्पं पहायला मिळावं या हेतूने या मालिकेची निर्मिती केल्याचं केदार सांगतो. याशिवाय केदार सध्या एका हिंदी सिनेमातही बिझी आहे. टिप्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं नाव आहे 'तो बात पक्की'. केदारनं टिप्ससोबत करार केला असून त्यांची निर्मिती असलेल्या तीन सिनेमांचं दिग्दर्शन तो करणार आहे. हाही एक विनोदी सिनेमा असून अभिनेत्री तब्बू, शर्मन जोशी आणि वत्सल सेठ यात मुख्य भूमिकेत आहे. ह्रषिकेश मुखजीर्ंच्या सिनेमांमधलीच विनोदी छटा या सिनेमात दिसेल असा विश्वास केदारनं व्यक्त केलाय. याबरोबरच 'एक होता सिद्धू' हा नवा मराठी सिनेमाही तो करतोय. सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत असेल. सिद्धार्थ यात नऊ ते दहा भूमिका करणार आहे. दोन्ही सिनेमांचं पोस्ट प्रॉडक्शन सध्या सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 9, 2009 04:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2009 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close