S M L

सोनियांचा विदर्भात मॅरेथॉन दौरा : पवारांसोबत संयुक्त सभा

10 एप्रिल सोनिया गांधी यांचा आज विदर्भात मॅरेथॉन दौरा होतोय. त्यांच्या एका दिवसात चार सभा होणार आहेत. त्यांची पहिली सभा आहे, प्रफुल्ल पटेल यांच्या भंडारा - गोंदिया मतदारसंघात साकोलीला, दुसरी सभा नरेश पुगलिया यांच्यासाठी आहे, चंद्रपूरमध्ये. हरीभाऊ राठोड यांच्या यवतमाळ मतदारसंघातही त्यांची सभा आहे. तर कामठीला शेवटची म्हणजे चौथी सभा मुकुल वासनिक यांच्या मतदारसंघात होणार आहे. सोनिया गांधींची ही चौथी सभा पावणेचार वाजता होणार आहे. सोनियांच्या प्रचारसभेत हल्ला होण्याची भीती गृहमंत्रालयानं व्यक्त केली होती. यात एलटीटीईचा धोका आहे, असंही म्हटलं होतं. पण आता एलटीटीईनं याचा इन्कार केला आहे. असं असलं तरी या सभांमध्ये सुरक्षाव्यवस्था कशी असावी, त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विदर्भातल्या पोलीस अधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली.सोनिया गांधी यांना होणारा वाढता अतिरेक्यांचा धोका पाहता आज विदर्भात ज्याज्या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहे त्या सभास्थानांना पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. सोनिया गांधींना असणा-या एसपीजी सुरक्षेव्यतरिक्त 1 हजारहून जास्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आलेत. त्यात सीपीआरएफच्या दोन कंपन्यांचा समावेश आहे. आज विदर्भामध्ये सोनिया-पवारांची जी संयुक्त सभा होणार आहे ती महत्त्वाची मानली जात आहे. कारण पवारांनी काँग्रेसच्या कलमाडींसाठी पुण्यात प्रचार केला होता. तर आज सोनिया राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांसाठी प्रचार करणार आहेत. शरद पवारांनी बुधवारी डावे नेते सिताराम येचुरी आणि बिजू जनता दलाच्या नवीन पटनायक यांच्यासोबत भुवनेश्वरमध्ये सभा घेतली होती.त्यामुळे पवार तिसर्‍या आघाडीच्या जवळ जात आहेत, असं दिसत असतानाच साकोलीच्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त होतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2009 06:38 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2009 06:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close