S M L

शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध

10 एप्रिल, मुंबई चला दिल्ली जिंकूयाचा नारा देत शिवसेनेनेवचननामा प्रसिद्ध केला. या वचननाम्यामध्ये शिवसेनेने महाराष्ट्रात भारनियमन पूर्णपणे रद्द करण्याचं वचन देताना शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार असल्याचंही ठामपणे सांगितलं. त्याचबरोबर न्यायालयात प्रलंबित प्रकरणांचा लवकर निकाल लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. अशा स्थानिक मुद्यांबरोबरच दहशतवादाचा बंदोबस्त तसंच महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचंही शिवसेनेने आपल्या वचननम्यात जाहीर केलं आहे. बेळगावच्या प्रश्नालाही शिवसेनेने हात घातला असून लवकरात लवकर सीमा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासनंही या वचननाम्यात आहे. एकूणच हा वचननामा बघता हा महाराष्ट्राच्या प्रश्नांवरच आधारीत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2009 11:16 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2009 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close