S M L

...'त्या' दिवशी सलमान नशेत होता ?

Sachin Salve | Updated On: May 19, 2014 11:05 PM IST

...'त्या' दिवशी सलमान नशेत होता ?

19 मे : 2002 च्या हिट ऍण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सेशन्स कोर्टात या प्रकरणी आज (सोमवारी) पुन्हा सुनावणी झाली. चौथ्या साक्षीदारानंही सलमानला ओळखलंय. हॉटेलचा वेटर आणि बॉडीगार्डने सलमानला ओळखलं आहे. हॉटेलमधून दारू पिऊन सलमान बाहेर पडला आणि गाडी स्वत:हा चालवून निघून गेला असं वेटरनं सांगितलंय.

या प्रकरणी 6 मे रोजीही सलमानची ओळख परेड घेण्यात आली होती. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी तिन्ही साक्षिदारांनी सलमानला ओळखलं. ज्या दिवशी हा अपघात घडला. सलमान गाडीमध्येच होता. सलमानची गाडी आमच्या अंगावरुन गेली, सलमानने तुमच्या अंगावरुन गाडी घातली असं तिथे असलेल्या लोकांनी आपल्याला सांगितलं अशी साक्ष या अपघातात जखमी झालेला मुस्लीम मियाँ शेख यांनी दिली.

अपघातानंतर गर्दी जमल्याचं पाहून सलमान पळून गेल्याचंही साक्षीदारांनी सांगितलंय. तर, मुस्लीम शेख या साक्षीदारानं आपल्याला दोन दिवसांपूर्वी सलमानकडून धमकी आल्याचा दावा केलाय. 5 लाख घेऊन तोंड बंद करण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्याने केला. सलमान खानने 2002 साली बेदरकारपणे गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्या निष्पाप लोकांना चिरडलं होतं. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले होते.

हिट अँड रन प्रकरणाचा घटनाक्रम

  • 28 सप्टेंबर 2002 - मुंबईत सलमानच्या गाडीखाली चिरडून 3 जखमी, 1 मृत्युमुखी
  • - सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
  • - महानगर दंडाधिकारी न्यायालयात प्रकरणाची सुनावणी रेंगाळली
  •  2013 - खटला मुंबई सेशन्स कोर्टाकडे
  • - खटला नव्याने सुरू करण्याची सलमानच्या वकिलांची मागणी मान्य
  • - 28 एप्रिल 2014 पासून खटल्याची नव्याने सुनावणी
  • - पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदवून खटल्याला सुरुवात
  • - 6 मे 2014 - सलमान खानची ओळख परेड
  • - प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सलमानला ओळखले
  • - 19 मे - चौथ्या साक्षीदारांनीही सलमानला ओळखले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2014 10:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close