S M L

'अपघातानंतर सलमानला गाडीतून बाहेर येताना पाहिलं'

Sachin Salve | Updated On: May 20, 2014 10:46 PM IST

'अपघातानंतर सलमानला गाडीतून बाहेर येताना पाहिलं'

20 मे : हिट अँण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला आज (मंगळवारी) आणखी एका साक्षीदाराची साक्ष झाली. सलमान खानच्या गाडी खाली चिरडलेल्या लोकांना ज्याने बाहेर काढलं होतं, त्या फ्रान्सिस फर्नांडिस याची साक्ष झाली. सलमान खान याला गाडीतून बाहेर येताना हि फर्नांडिस यानं पाहिल होतं. तशी साक्ष त्याने आज कोर्टात दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 जून रोजी होणार आहे. महत्वाचं म्हणजे हा खटला जुलै महिन्यात संपवावा, अशी सुचना न्यायमूर्ती देशपांडे यांनी केली.

फ्रान्सिस फर्नाडिस हे घटना स्थळापासून जवळच राहतात. सलमान खान याने जेव्हा अपघात केला होता. त्यावेळी बराच आरडाओरडा झाला. तो आवाज एकूण आपण घटनास्थळी पोहचला. तात्काळ सलमानच्या गाडी खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पुढे गेलो. यावेळी अपघातग्रस्त गाडीतून सलमान बाहेर आला होता, हे आपण पाहिलं असं फार्नाडिस यांनी आपल्या साक्षित सांगितलं.

या प्रकरणातील फर्नांडिस हे सातवे साक्षीदार आहे. सलमान खान आज सकाळी कोर्टात हजर झाला होता. सर्व सुनावणी तो काळजी पूर्वक ऐकत होता. साक्षीदार काय सांगतोय या बाबत त्याला उत्सुक्ता असल्याचं दिसत होतं. त्यांची साक्ष झाल्यानंतर सलमान याच्याकडून साक्षिदारांना धमकावण्यात आल्याच्या प्रकरणाची दखल घेण्यात आली. मुस्लीम शेख या जखमी साक्षिदारास 4 मे रोजी मुकेश पांडे यांनी धमक्या दिल्याची तक्रार मुस्लीम शेख याने कोर्टाकडे तक्रार दाखल केल्यानं कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते. या बाबत पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2014 09:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close