S M L

नारायण राणेंना मुख्यमंत्री करा, समर्थकांची मागणी

Sachin Salve | Updated On: May 20, 2014 10:27 PM IST

नारायण राणेंना मुख्यमंत्री करा, समर्थकांची मागणी

20 मे : लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची झालेली पिछेहाट पाहता काँग्रेस श्रेष्ठींनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडेच आता राज्याचं नेतृत्व सोपवावं असा ठराव सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणी केलाय. याबाबत 22 मे ला प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काँग्रेसचे पदाधिकारी भेट घेऊन तशी आग्रही मागणी करणार आहेत.

निलेश राणेंच्या पराभवामुळे नारायण राणेंनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वीकारू नये यासाठी हे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांणाही भेटणार आहेत. मोदी लाट जरी असली तरी सरकारच्या चांगल्या योजना प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत असा आरोपही या कार्यकरिणीने केलाय. काँग्रेसची विकासकामं जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडलो असल्याची कबुलीही यावेळी राणे समर्थकांनी दिली असून पुन्हा एकदा जनतेत जाऊन याबाबत जागृती करणार असल्याचंही पदाआधिकार्‍यांनी सांगितलंय.

राणेंसारखं आक्रमक नेतृत्व राज्याला आणि काँग्रेसला हवंय. तरच काँग्रेसची जी पिछेहाट झाली ती भरून निघेल. आम्ही तशी मागणी माणिकरावांकडे 22 मे ला करणार आहोत असं जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस काका कुडाळकर यांनी सांगितलं. राणे साहेबांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारू नये. त्यामुळे काँग्रेसची वाईट अवस्था होईल.आम्ही कार्यकर्ते कमी पडलो आम्ही पुन्हा जनतेत जाऊन योजना लोकांपर्यंत पोहोचवू अशी भूमिका जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2014 10:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close