S M L

प्रो कबड्डीत खेळाडूंची दिवाळी, लाखांची बोली !

Sachin Salve | Updated On: May 21, 2014 06:28 PM IST

 प्रो कबड्डीत खेळाडूंची दिवाळी, लाखांची बोली !

21 मे : एकीकडे आयपीएलचा आलेख घसरत असताना दुसरीकडे मात्र कबड्डीला तेजीचे दिवस आले आहेत. नुकत्याच झालेल्या प्रो कबड्डीच्या लिलावाने भारतीय कबड्डीपटूंवर लाखो रुपयांची बोली लावत लवकरच कबड्डीलाही चांगले दिवस येणार असंच दिसतंय.

 

प्रो कबड्डीच्या या पहिल्यावहिल्या लिलावात 13 खेळाडुंना 10 लाखांपेक्षा अधिक भाव मिळाला आहे. यापैकी आपल्या हुकमी चालींसाठी ओळखला जाणारा रेल्वेच्या राकेश कुमार याला सर्वात जास्त 12.80 लाख रुपयांची रक्कम मिळालीय. येत्या 26 जुलै रोजी मुंबईत प्रो कबड्डीच्या सामन्यांना सुरूवात होणार असून अंतिम सामना 31 रोजी बंगळुरुला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2014 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close