S M L

दीपक केसरकर शिवसेनेच्या वाटेवर?

Sachin Salve | Updated On: May 21, 2014 08:15 PM IST

दीपक केसरकर शिवसेनेच्या वाटेवर?

21 मे : सिंधुदुर्गात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या गडाला सुरूंग लावणारे राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. पण दीपक केसरकर यांनी मात्र याला दुजोरा दिला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सज्जन मनाचे नेते आहेत, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केलीय. दीपक केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरेंचीही स्तुती केलीय आणि त्याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवरही टीका केली.

माझी लढाईही अजून संपलेली नाही. ज्या ज्या वेळेला युतीची सत्ता आली तेव्हा कोकणाला झुकतं माप दिलं गेलंय. कारण बाळासाहेबांना कोकणाबद्दल आत्मियता होती ती उद्धव ठाकरे यांनाही आहे अशी स्तुतीसुमनं केसरकर यांनी उधळली. तसंच जे निर्णय युतीच्या काळात झाले ते आघाडीच्या काळात झाले नाही अशी टीकाही त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांच्याविरोधात प्रचार न करण्याचा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली घेतला होता. याचा परिणाम निकालावरही दिसून आला.

निलेश राणे यांचा दारुण पराभव झाला आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत विजयी झाले. सेनेच्या विजयाची पायाभरणी ही केसरकर यांच्या आंदोलनामुळेच झाली. मात्र केसरकर यांनी जेव्हा राणेंचा विरोध केला तेव्हा राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई केली होती. आता राज्यात युतीची लाट दिसून येत आहे. संघर्षाच्या काळात घरच्यांकडून साथ न मिळाल्यामुळे आता केसरकर यांनी सेनेची वाट धरलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2014 08:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close