S M L

कोल्हापुरात मंडलिकांच्या पराभवामुळे शिवसेनेत दुफळी

Sachin Salve | Updated On: May 21, 2014 09:50 PM IST

कोल्हापुरात मंडलिकांच्या पराभवामुळे शिवसेनेत दुफळी

21 मे : कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक हे 33 हजार मतांनी पराभूत झाले त्यांच्या पराभवानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेमधली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा कार्यकारिणी आणि सेनेचे आमदार यांच्यात हा संघर्ष निर्माण झाला आहे.

मंडलिक यांचा पराभव शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके आणि भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच झाल्याचा आरोप सेनेच्या चिंतन मेळाव्यात शिवसैनिकांनी केला आहे. हा मेळावा जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या गटाने आयोजित केला होता. त्यामध्ये पदाधिकार्‍यांनी थेट आमदारांवर आरोप करत त्यांच्याकडे असलेलं शिवसेनेचे शहरप्रमुखपद काढून घ्यावं अशी मागणी केली आहे.

त्याचबरोबर शहरातले आमदार असतानाही काहीच निधी आमदारांनी दिला नाही असा आरोपही सेनेच्या नगरसेवकांनी केला. तर दुसरीकडे क्षीरसागर यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आहे. जिल्हाप्रमुख हेच संघटना बांधणीमध्ये कमी पडल्याचा आरोप त्यांनी केला. तर दोन्ही गटांनी आप-आपले अहवाल हे पक्षाच्या वरीष्ठांकडे पाठवणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यात हा वाद थेट 'मातोश्री'वर पोहोचण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2014 09:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close