S M L

'जे झालं ते झालं, आता कामाला लागा'

Sachin Salve | Updated On: May 22, 2014 10:52 PM IST

23_news_sharad_pawar_news22 मे : लोकसभेत जे झालं ते झालं आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवारी) आपल्या मंत्र्यांना दिला.

ही विधानसभा निवडणूक काँग्रेसबरोबरच लढवली जाईल त्यासाठी राज्य सरकारचे निर्णय आणि कार्यक्रम तातडीने लोकांपर्यंत पोचवावे, अशा सूचना पवारांनी मंत्र्यांना दिल्या. या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून राज्यात नेतृत्वबदल करण्याची गरज नाही, असं पवारांनी सांगितलंय. आज मुंबईत राष्ट्रवादीची पुन्हा एकदा चिंतन बैठक पार पडली.

या अगोदर पवारांनी अनेक बैठकांमधून मतदारसंघाचा आढावा घेतला होता. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अगोदरच पवारांनी बैठक घेऊन विधानसभेच्या कामाला लागा असे आदेश देऊन आपला पराभव मान्य केला असे संकेतच दिले होते. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. जेमतेम चारच जागा राष्ट्रवादीच्या पदरात पडल्या. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या सारखे दिग्गज नेते पराभूत झाले.

हेच नाहीतर पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा बारामतीतून विजय झाला नक्की पण तो विजय हजाराच्या संख्येतच झाला. मागिल निवडणुकीत सुप्रिया सुळे तब्बल 3 लाखांनी विजयी झाल्या होत्या. त्यामुळे हा पराभव राष्ट्रवादीच्या चांगल्या जिव्हारी लागलाय. दोन दिवसांपूर्वीच पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट एकत्र विधानसभेला जाऊ अशी रणनीती आखल्याची चर्चा आहे. विधानसभेच्या दृष्टीने पवार आता स्वत: बैठका घेऊन कार्यकर्ते नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2014 10:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close