S M L

नागपूरमध्ये लिफ्टला आग लागून 5 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: May 23, 2014 02:59 PM IST

नागपूरमध्ये लिफ्टला आग लागून 5 जणांचा मृत्यू

23 मे :   नागपूरच्या गोकुळपेठ परिसरात इमारतीच्या लिफ्टमध्ये आग लागून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

गोकुळपेठ परिसरातल्या अजिंक्य इमारतीच्या लिफ्टला आग लागली आणि त्यात होरपळून एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. सलीला प्रकाश शिरीया (65), रागिणी विशाल शिरीया (35), विराट निशांत शिरीया (3) श्रुती श्रीकांत माळी (30) सहाना श्रीकांत माळी (अडीच वर्षे) अशी या पाच जणांची नावं आहेत. या बिल्डिंगच्या पार्किंगमधल्या गाड्यांना आग लागली होती तीच आग लिफ्टपर्यंत गेली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2014 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close