S M L

मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं

Sachin Salve | Updated On: May 23, 2014 09:59 PM IST

kolhapur crime23 मे : मुलगी झाल्यामुळे एका 22 वर्षीय विवाहितेला जिंवत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडला आहे. लातूर तालुक्यातल्या करकट्टा या गावातल्या पूजा साबळे या विवाहितेला मुलगी झाली.

त्याचा राग येऊन सासरच्या मंडळींनी तिला जाळलं. यात पूजा 98 टक्के भाजली. तिच्यावर बूजावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूजाने दिलेल्या जबाबावरून तिच्या सासू सासरा व पतीसह अन्य तिघा जणांच्या विरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2014 09:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close