S M L

20 एप्रिलला सोनियांचा पुन्हा महाराष्ट्र दौरा

13 एप्रिल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या 20 एप्रिलला महाराष्ट्रात पुन्हा प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती आयबीएन लोकमतला अधिकृत सूत्रांकडून कळली आहे. यादिवशी त्यांच्या एकूण तीन सभा होणार आहेत. त्यापैकी नंदुरबार किंवा धुळे याठिकाणी एक, जालना किंवा औरंगाबाद इथे एक आणि पुणे अशा तीन सभा होतील. गांधी घराणं नेहमीच त्यांच्या महाराष्ट्रातल्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारच्या आदिवासी पट्‌ट्यातून करतं. पण यावेळी सोनियांची सभा भंडारा गोंदीयाला झाली. त्यामुळे येत्या दौर्‍यातली पहिली सभा ही नंदुरबार किंवा धुळे या मतदारसंघांत घेतली जावी असं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. मराठवाड्यात काँग्रेसचे चार उमेदवार असल्यामुळे तिथे सोनियांची एक सभा होणार आहे. सोनियांची एखादी सभा कोकणातही व्हावी यासाठी काँग्रेस नेते नारायण राणे हे इच्छुक होते. आपल्या मुलाला त्याचा फायदा होईल असं त्यांना वाटत होतं. पण, सोनियांची सभा आता कोकणात होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2009 10:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2009 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close