S M L

अखेर 'जालना' आणि 'बीड'करांनी दिल्ली गाठली !

Sachin Salve | Updated On: May 27, 2014 03:46 PM IST

अखेर 'जालना' आणि 'बीड'करांनी दिल्ली गाठली !

27 मे : कायम मागास असलेल्या बीड आणि जालन्याला गोपीनाथ मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्या रुपाने पहिल्यांदाच केंद्रात मंत्रीपद मिळालंय.पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात ग्राम विकास मंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे आणि राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांनी शपथ घेतली. गोपीनाथ मुंडेंकडे ग्रामविकास खातं सोपवण्यात आलंय.

 

स्वातंत्र्यानंतर प्रथमच बीड आणि जालन्याला केंद्रात प्रतिनिधित्व मिळालंय. महायुतीचे जनक असणारे गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात पाच राष्ट्रवादीचे आमदार असूनही दीड लाखांहून अधिक मताधिक्य मिळवण्याची किमया केलीय. मराठवाड्याला दोन मंत्रीपदं मिळाली त्याचा फायदा येणार्‍या विधानसभेत महायुतीला मिळण्याची शक्यता आहे.

 

येणार्‍या निवडणुकीत मुंडेंना बीड जिल्हा राष्ट्रवादीमुक्त करायचा आहे तर जालन्याचे रावसाहेब दानवे हेही चौथ्यांदा निवडून आले आहेत आता त्यांना जालन्यात भाजपची मुळं खोलवर रुजवायची आहेत.एकंदरीत मागास मराठवाड्याला दोन मंत्रीपदं मिळाल्याने मराठवाड्याच्या जनतेच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2014 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close