S M L

राष्ट्रवादीकडून फेरबदल;आव्हाडांना बढती, फौजियांना डच्चू मिळण्याची शक्यता

Sachin Salve | Updated On: May 28, 2014 09:25 PM IST

राष्ट्रवादीकडून फेरबदल;आव्हाडांना बढती, फौजियांना डच्चू मिळण्याची शक्यता

28 मे : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता आहे. कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. विजयकुमार गावित यांच्या जागी आव्हाडांची वर्णी लागू शकते. विजयकुमार गावित यांचे भाऊ शरद गावित यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकण्याची शक्यता आहे तर फौजिया खान यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता आहे.

उद्या सकाळी दहा वाजता राजभवनात हा शपथविधी होणार असल्याचं कळतंय. निवडणुकीच्या दरम्यान, विजयकुमार गावित यांनी आपली मुलगी हीना गावित हिच्यासाठी पक्षात बंड पुकारले होते. हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. पण त्यांच्यामुळे विजयकुमार गावित यांच्यावर राष्ट्रवादीने कारवाई केली.

गावित यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली तसंच त्यांच्याकडे असलेलं वैद्यकीय मंत्रीपदही काढून घेतलं. त्यामुळे वैद्यकीय मंत्रीपदी आता जितेंद्र आव्हाड विराजमान होण्याची शक्यता आहे. तर फौजिया खान यांनी औरंगाबादमध्ये निवडणुकीच्या दरम्यान उमेदवाराला सहकार्य केलं नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2014 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close