S M L

'जितबो रे', कोलकाता फायनलमध्ये

Sachin Salve | Updated On: May 28, 2014 09:41 PM IST

'जितबो रे', कोलकाता फायनलमध्ये

28 मे : आयपीएलच्या सातव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या क्वालिफाईंगमध्ये कोलकात्याने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 28 रन्सने दणदणीत पराभव केला आहे. टॉस जिंकून पंजाबनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याने पंजाबसमोर विजयासाठी 164 रन्सचं टार्गेट ठेवलं.

कोलकात्यातर्फे रॉबीन उत्थप्पाने 42 रन्स केले. पण इतर एकही बॅट्समन मोठा स्कोर करू शकला नाही. पंजाबतर्फे करणवीर सिंगनं 3 तर अक्शर पटेल आणि मिचेल जॉन्सननं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 164 धावांचा पाठलाग करणार्‍या पंजाबची सुरुवात खराब झाली. नमन वोहरा आणि वृद्धिमान सहानं सुरुवात तर चांगली केली. पण ते आऊट झाल्यानंतर ठराविक अंतरानं त्यांच्या विकेट जात राहिल्या. कॅप्टन बेलीने तळाला येऊन 26 रन्सची फटकेबाजी केली खरी पण तो विजय मिळवून देऊ शकला नाही.

कोलकात्यातर्फे उमेश यादवने 3 तर मॉर्नी मॉर्केलने 2 विकेट घेतल्या. या मॅचमध्ये दणदणीत विजय मिळवत कोलकात्याने थेट फायनलमध्ये धडक दिली. तर पंजाबला अजूनही एक संधी बाकी आहे. दुसर्‍या क्वालिफाईंगमध्ये त्यांनी विजय मिळवला तर त्यांनाही स्पर्धेची फायनल गाठता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2014 09:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close