S M L

वर्ध्यात खासगी बस पेटल्याने पाच जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2014 02:56 PM IST

वर्ध्यात खासगी बस पेटल्याने पाच जणांचा मृत्यू

accident vardha29 मे : वर्धा जिल्ह्यात नागपूर-अमरावती महामार्गावर आज पहाटे एका खासगी बसने अचानक पेट घेतल्याने अपघात झाला. तळेगाव गावाजवळ सत्याग्रही घाटात झालेल्या या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत.

जखमींवर तळेगावच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बाबा ट्रॅव्हल्सच्या जळगावहून नागपूरला येणार्‍या बसने अचानक पेट घेतला आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत असून अपघाताचे कारण शोधण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2014 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close