S M L

जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2014 03:51 PM IST

जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

jitendra oath29 मे : लोकसभा निवडणुकीचे अपयश झटकत विधानसभेत बाजी मारण्यासाठी काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीने अखेर मंत्रिमंडळात फेरबदल करत राष्ट्रवादीचे आक्रमक कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षणमंत्रिपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

राज्यपाल के. शंकरनारायण यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे आमदार हजर नव्हते. यातून त्यांची नाराजी दिसून आली.

शपथविधीनंतर प्रथमचं आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझा आनंद व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत. पवार साहेबांनी माझ्यासाठी जी योग्य जबाबदारी वाटली ती त्यांनी दिली आहे. असं ते म्हणाले.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर विरोधकांची टीका काहीही बदल करून फायदा नाही बदलांना खूप उशीर झालाय अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे दिली आहे. तर मनसेच्या बाळा नांदगावकरांनीही या फेरबदलामुळे काही फरक पडणार नाही, असं मत व्यक्त केलं. त्याचवेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2014 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close