S M L

वडाळ्यात महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

14 एप्रिल, मुंबई वडाळा इथल्या राजीव गांधी नगरात राहणार्‍या एका महिलेनं टाटा पॉवरच्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुवर्णा चोरघे असं या महिलेचं नाव आहे. तिच्या राहत्या घराची पडझड झाल्यानं तिनं घराचं बांधकाम करायचं ठरवलं होतं. पण घरासमोरच्या मोकळ्या जागेत बांधकाम चालू असतांना काही स्थानिक महिलांनी येऊन तिला मारहाण केली आणि तिचं बांधकाम थांबवलं. सुवर्णा चोरघेंनी याबद्दल पोलिसांकडे दाद मागितली. पण काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आपल्या 12 वर्षांच्या मुलीला घेऊन ती टॉवरवर आत्महत्या करण्यासाठी चढली. हा प्रकार समजताच अग्नीशमन तसचं पोलीस दलाचे अधिकारी तिथे आले. आणि या महिलेला खाली उतरवण्यात आलं. वडाळा पोलिसांनी आता तिला ताब्यात घेतलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2009 10:47 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2009 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close