S M L

सुंदर हत्तीला सोडा, सुप्रीम कोर्टाचेही आदेश

Sachin Salve | Updated On: May 29, 2014 04:56 PM IST

सुंदर हत्तीला सोडा, सुप्रीम कोर्टाचेही आदेश

29 मे : कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा देवस्थानच्या सुंदर हत्तीची सहा वर्षांच्या यातनेतून अखेर सुटका होणार आहे. वारणानगर साखर कारखान्यामध्ये असलेल्या सुंदर हत्तीची दुरवस्था झाल्यामुळे त्याला बाणेरगट्टा प्राणीसंग्रहालयात हलवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम राखत हे आदेश दिले आहे. सुंदर हत्तीला 15 जूनपर्यंत हलवा असे निर्देश कोर्टाने दिले आहे. याबद्दल आमदार विनय कोरेंनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळलीय.

सुंदर हत्तीचा छळ होत असल्याच्या कारणावरुन पेटा या संस्थेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने आमदार विनय कोरे यांना फटकारत सुंदरला प्राणी संग्रहालयात हलवण्याचा आदेश दिला होता. तरीही कोरे यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत 15 तारखेपूर्वी सुंदराला प्राणी संग्रहालयात हलवण्याचे आदेश दिले आहे.

तसंच येत्या 31 मे रोजी राष्ट्रीय स्तरावरची एक समिती कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणानगरमध्ये येणार असून त्यानंतर सुंदरला हलवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात पशुवैद्यकीय अधिकारी आणि बाणेरगठ्ठाच्या प्रशासनाने वारणानगरमध्ये येऊन सुंदरला हलवण्यास आता योग्य वेळ असल्याचंही स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2014 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close