S M L

मुंबईतल्या कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा

Samruddha Bhambure | Updated On: May 30, 2014 02:50 PM IST

campa cola campound30 मे : मुंबईतल्या कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. घरं रिकामी करण्याच्या मुंबई महापालिकेच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 3 जूनसा सुनावणी होणार आहे.

मुंबईतील वरळी येथे कॅम्पा कोला ही इमारत असून या इमारतीतील काही मजले बेकायदेशीर असल्यामुळे काही महिन्यांपूर्वी या अनधिकृत मजल्यांवर महापालिकेकर्फे हतोडा मारण्यात येणार होता. मात्र या प्रकरणी कॉम्पा कोलाच्या रहिवाशांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

याआधी घरं खाली करण्यासाठी रहिवाशांना 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आज महापालिकेनं कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना 3 जूनपर्यंत घरं सोडण्याचा आदेश दिला आहे. पावसाळा संपेपर्यंत राहण्याची परवानगी मिळावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती. सुनावणीनंतर बाहेर पडण्याविषयी निर्णय होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2014 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close