S M L

'अशोकपर्व' धोक्यात ?, चव्हाणांवर 5 आरोप निश्चित

Sachin Salve | Updated On: May 30, 2014 11:05 PM IST

8979asokh_chavan_paid_news30 मे : लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची लाज राखणारे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पेड न्यूज प्रकरणी पाय आणखी खोलात गेलाय. पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाने अशोक चव्हाणांवर आरोप निश्चित केले आहेत. अशोक चव्हाणांवर 5 आरोप ठेवण्यात आले आहेत.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत पेड न्यूज दिली ती जाहिरात आहे की बातमी ? जाहिरात आणि पेड न्यूज असेल तर मग निवडणूक खर्चात तसा उल्लेख का नाही ?, उल्लेख केला नसेल तर त्याचं कारण काय ? आणि उल्लेख केला नसेल तर ते मग निवडणूक खर्च मर्यादेचं उल्लंघन नाही का? असा सवाल आयोगाने उपस्थित केला.

तसंच जर हे खरं असेल की, ती पेड न्यूज किंवा जाहिरात होती, पण त्याचा उल्लेख नाही तर मग अशोक चव्हाणांचं सदस्यत्व रद्द का होऊ नये? असा सवाल ही आयोगाने उपस्थित केला. आता यापुढे या प्रकरणीची 9 जूनपासून न्यायालयीन सुनावणी सुरू होणार आहे. या प्रकरणात 20 जूनच्या आधी निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे हे पेड न्यूजचं प्रकरणं ?

- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर 2009च्या विधानसभा निवडणुकीत पेड न्यूज दिल्याचे आरोप

- महाराष्ट्रातील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये 'अशोकपर्व' नावाची पुरवणी छापण्यात आली

- ही बातम्यांची पुरवणी असल्याचा अशोक चव्हाणांचा दावा

- ही छुपी जाहिरात असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा

- निवडणूक आयोगाकडून प्रकरणाची सुनावणी सुरू

- पण आयोगाला सुनावणीचा अधिकार नाही, असा अशोक चव्हाणांचा युक्तिवाद

- निवडणूक आयोगाच्या अधिकाराला आधी हायकोर्टात, मग सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं

- निवडणूक आयोगाला या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार - सुप्रीम कोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2014 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close