S M L

'CMपदाचा उमेदवार जाहीर करा नाहीतर माफी मागा'

Sachin Salve | Updated On: May 30, 2014 07:44 PM IST

'CMपदाचा उमेदवार जाहीर करा नाहीतर माफी मागा'

 45747858sawant_bjp30 मे : लोकसभा निवडणुकीत दमदार यश मिळवल्यानंतर महायुतीला विधानसभेचे वेध लागले आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण असणार यावरुन महायुतीत रस्सीखेच सुरू झालीय. आता यात काँग्रेसनेही उडी घेतलीय.

 

भाजपचे नेते विनोद तावडे यांनी महायुतीचा मुख्यमंत्री कोण ते विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ठरवू असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानातून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत भाजपचे दुटप्पी धोरण स्पष्ट होतं आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय. तसंच सावंत यांनी प्रसिद्धीपत्रक काढलं असून भाजपला धारेवर धरलंय.

 

भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार तातडीने जाहीर करावा, नाहीतर लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा असंवैधानिक मुद्दा मोठा करुन देशाची फसवणूक केल्याबद्दल माफी मागावी असं सचिन सावंत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुका गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं स्पष्ट केलं पण मुख्यमंत्री कोण असणार हे निकालानंतर स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आपण मुख्यमंत्री व्हावं असं सांगून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आपण असल्याचं स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2014 07:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close