S M L

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला?

Samruddha Bhambure | Updated On: Jun 1, 2014 05:07 PM IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला?

1 जून : काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून अजूनही घोळ कायम असल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ररखडला आहे. आज सायंकाळी चार वाजता होणार शपथविधी पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि  प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे अजूनही दिल्लीतच आहेत. नव्या मंत्रिपदांची नावे निश्चितीसाठी अध्यक्ष सोनिया गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक सुरु आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा काँग्रेसचा विस्तार चर्चेच्या गुर्‍हाळ वाजवीपेक्षा जास्त लांबल्यानं रखडला. पावसाळी अधिवेशाच्या तोंडावर मंत्रिमंडळात फेरबदल करू नये, यावर पक्षश्रेष्ठींचं एकमत झालं. पण, काँग्रेसच्या कोट्यातल्या तीन जागा भरून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय काल मध्यरात्री झाला. सकाळच्या बैठकीत तीन मंत्र्यांची नावं निश्चित होणार होती. अमित देशमुख, अब्दुल सत्तार आणि रमेश बागवे यांची नावंही निश्चित झाली. पण, अमित देशमुख सोडले तर इतर दोन नावांवर पक्षश्रेष्ठींनीच फुली मारली. त्यामुळे अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारच तात्पुरता रोखण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान, राज्याच्या राजशिष्टाचार विभागानंसुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार तात्पुरता रोखण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.

मंत्रिमंडळाच्या फेरबदलाला अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचाच विरोध असल्याचं कळतं आहे. काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण उफाळलं आहे. एकंदरीतच पावसाळी अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार एवढं मात्र नक्की.

दुसरीकडे, कॉंग्रेसचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचा दोनच दिवसांपूर्वी शपथविधी झाला. नंतर काँग्रेसने फेरबदल करण्‍याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क मांडले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2014 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close