S M L

आधी नेता निवडा, मगच निवडणूक लढा - अजित पवार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 1, 2014 06:01 PM IST

आधी नेता निवडा, मगच निवडणूक लढा - अजित पवार

1 जून :   विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडावा असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. यामुळे अजित पवार स्वत:ला मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत का याची चर्चा सुरू झालीये. लोकसभा निवडणुकीत नेतृत्व आधीच जाहीर केल्यामुळे भाजपला यश मिळालं, असंही अजित पवार यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. पण काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये यशस्वी होण्यासाठी उमेदवार जाहीर करण्याची गरज नाही असं मत व्यक्त केलं होतं. एकूणच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भावा-बहिणीचं मत परस्परविरोधी असल्याचं दिसतं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रथम नेता निवडावा आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढाव्यात असं मत अजित पवार यांनी मांडलं आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या यशाचं गमक पक्षानं त्यांचं नेतृत्त्व आधी जाहीर करण्यात आहे. काँग्रेससोबत निवडणूक लढवायची असेल तर शरद पवारांनी आधी सर्व नेते कार्यकर्त्यांना बोलावून त्यांचं मत जाणून घ्यावं असं म्हणतानाच दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतरही मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीत काहीच फरक पडलेला नाहीए अशी टीकाही त्यांनी केली आहे.

आघाडी सरकार चालवताना काही गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत त्यात आमच्या दोघांच्याही चुका असल्याचं मान्य करत त्यांनी माझ्याच नेतृत्त्वाखाली विधानसभा लढवण्याचा आग्रह नाही मात्र सर्वसहमतीनं ज्याचं नाव पुढे येईल त्याच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवावी असं मत व्यक्त केलं आहे. भाजपने अनेक दिग्गज्जांना बाजूला सारुन मोदींचं नाव पुढे आणलंच, लोकांना आता कणखर आणि धाडसी निर्णय घेणारे नेतेच आवडतात. महाराष्ट्र हे राष्ट्रवादीचे घर आहे, कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊ नये, त्यांना थोडे टॉनिक देण्याची गरज आहे असं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2014 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close