S M L

...ते 1 तास 5 मिनिटं !

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2014 08:01 PM IST

...ते 1 तास 5 मिनिटं !

sdfa67gopinath_munde_no more03 जून : आजचा सूर्योदय हा एका महान पर्वाच्या अस्ताने उजाडला यावर कुणालाही विश्वास ठेवणं कठीण आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाही आज सकाळी त्यांच्या गाडीला दिल्लीत अपघात झाला आणि एका लढवय्या नेत्यांला आपण मुकलो..नेमकं सकाळी काय घडलं त्याचा घटनाक्रम....

 • - 6.15: गोपीनाथ मुंडे 21, लोधी इस्टेट या निवासस्थानाकडून विमानतळाच्या दिशेने निघाले
 • - त्यांच्यासोबत गाडीत त्यांचा खाजगी सचिव नायर आणि ड्रायव्हर होते
 • - 6.20: पृथ्वीराज रोडच्या चौकात एका इंडिका गाडीने मुंडेच्या गाडीच्या दरवाजाला जोरदार धडक दिली
 • - पुढची 5 मिनिटं मुंडे त्याच ठिकाणी अपघातग्रस्त गाडीत थांबले; त्यांना जोरदार धक्का बसला होता
 • - मुंडेनी नायर यांच्याकडे पाणी मागितलं; पाणी पिताक्षणीच मुंडेंना अस्वस्थ वाटू लागलं
 • - मुंडेनी ड्रायव्हर अनिल सिंगला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं
 • - हॉस्पिटलमध्ये जाताना गाडीतच मुंडेंना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांची शुध्द हरपली
 • - 6.30: मुंडेंना एम्सच्या इमर्जन्सी विभागात दाखल करण्यात आलं
 • - 6.40: मुंडेंना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवलं
 • - 6:40 : ट्रॉमा सेंटरमध्ये आणल्यानंतर मुंडेंच्या हाताची नाडी सापडच नव्हती. तर मुंडेंचा श्वासही थांबला होता.
 • - पुढची 50 मिनिटं डॉक्टरांनी मुंडेना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली
 • - 7.20: गोपीनाथ मुंडेंची प्राणज्योत मालवली
 • - 8:15: नितीन गडकरी हॉस्पिटलमध्ये दाखल; एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना मुंडेच्या निधनाची बातमी दिली
 • - 8.30: गडकरींनी पंतप्रधानांना फोन करून मुंडेंचं निधन झाल्याच कळवलं.
 • - 8.45: गडकरी आणि आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी मुंडेंच्या निधनाची माहिती प्रसारमाध्यमांना कळवली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2014 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close