S M L

गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली लिहा

Sachin Salve | Updated On: Jun 4, 2014 09:29 AM IST

गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली लिहा

03 जून : भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं आज सकाळी अपघातात निधन झालं. बीड ते दिल्ली असा राजकीय प्रवास आज अचानक थांबला. त्यांच्या जाण्यामुळे मराठवाड्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून महाराष्ट्र एका लढवय्या नेत्यांना मुकलाय. मुंडेंच्या बीड-परळीमध्ये कार्यकर्त्यांवर दुखाचे डोंगर कोसळले असून अश्रूंचा बांध फुटलाय. गोपीनाथ मुंडे नुसते नेते नव्हते तर एक लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती. जनमानसासाठी काम करणार असा हा नेता आज आपल्यात नाही. आपल्या या लाडक्या नेत्यांला तुम्ही शब्दांतून श्रद्धांजली वाहू शकता...खालील कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा...

एक उमदा नेता गेला - राज ठाकरे

आमचा आधार गेला -नितीन गडकरी

बातमीवर विश्वास ठेवणं कठीण, मुंडे म्हणजे भाजप-सेनेतला दुवा- जोशी

पक्षाच्या मर्यादा ओलांडून मैत्री जपली -हर्षवर्धन पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट

- गोपीनाथ मुंडेंसारख्या अद्वितीय नेतृत्वाला आपण मुकलो आहोत. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले, मागासलेल्या जातीतून आलेले मुंडे खर्‍या अर्थानं लोकनेते होते. गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराच्या दु:खात सहभागी आहोत. मुंडे यांच्या निधनानं झालेली पोकळी कधीच न भरुन येणारी आहे. या दु:खाच्या क्षणी आम्ही सर्वजण मुंडे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत, दु:खात सहभागी आहोत.

सुषमा स्वराज यांचं ट्विट

- मुंडेंच्या अपघाती निधनानं तीव्र धक्का बसलाय. मुंडेंच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी त्यांचं मनापासून सांत्वन -सुषमा स्वराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2014 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close