S M L

प्रदेश कार्यालयावर मुंडेंना निरोप

Sachin Salve | Updated On: Jun 4, 2014 01:09 PM IST

प्रदेश कार्यालयावर मुंडेंना निरोप

01_Funeral-procession-of-late-BJP-leader-Gopinath

03 जून : भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव मंुबईतील वरळी इथल्या पूर्णा निवासस्थानी आणण्यात आलंय. काही काळ मुंडेंचं पार्थिव निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी मुंडेंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. भाजपचे सर्व नेते उपस्थित आहे.

 

त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास पार्थिव भाजपच्या प्रदेश कार्यालयात ठेवण्यात आलं. अंत्यदर्शनासाठी मध्यरात्री 12 पर्यंत वेळ ठेवण्यात आली असताना कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे मध्यरात्रीपर्यंत रीघ कायम होती. केंद्रीय मंत्र्यांसह, खासदार, आमदार आणि पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी श्रद्धांजली वाहिली, दर्शन घेताना काही गोंधळ होऊ नये म्हणून बॅरेक्टस् लावण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार कार्यकर्त्यांना शांततेत दर्शन घेण्याच्या सुचना करत होते. लोकसभेच्या निवडणुकीपासून ते निकालापर्यंत सर्व मोर्चेबांधणी प्रदेश कार्यालयावर करण्यात आली होती.

 

मुंडेंच्या उपस्थिती कार्यालयावर पत्रकार परिषदा, बैठका पार पडल्या होत्या. 16 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यालयावर मोठा जल्लोष करण्यात आला होता. गेला महिन्याभरापासून कार्यालयावर असलेल्या आनंदाच्या वातावरण मंगळवारी हुंदके आणि शांतेत बदललं. ज्या नेत्यांच्या सहवासात कार्यालयावर वेळ घालवला त्याचं नेत्याला श्रद्धांजली वाहताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2014 09:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close