S M L

आपच्या नेत्या अंजली दमानियांचा पक्षाला रामराम

Samruddha Bhambure | Updated On: Jun 5, 2014 12:47 PM IST

sdf675anjali damaniya05 जून  : आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र समन्वयक आणि पराभूत उमेदवार अंजली दमानिया यांनी सदस्यत्त्व आणि पदाचा आज राजीनामा दिला आहे. आपच्या ज्येष्ठ नेत्यांना पत्र लिहून त्यांनी हे कळवलेलं आहे. त्यांच्यासोबतच सोबतच आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनीही राजीनामा दिलेला आहे.

आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या अंजली दमानिया या पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर कमालीच्या नाराज असल्याची चर्चा आहे. अंजली दमानियांनी नागपूरमधून नितीन गडकरींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती.

याआधी अपच्या शाझिया इल्मी, कॅप्टन गोपीनाथ, योगेंद्र यादव या पक्षातल्या बड्यानेत्यांनीही राजीनामा दिल आहे. मात्र पक्षाचे नेते मयांक गांधी यांनी मात्र दमानिया आपमध्येच राहणार असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2014 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close