S M L

खूशखबर! मुंबईत लवकरच धावणार मेट्रो

Samruddha Bhambure | Updated On: Jun 6, 2014 08:51 PM IST

खूशखबर! मुंबईत लवकरच धावणार मेट्रो

06  जून :  मुंबई मेट्रोच्या घाटकोपर ते वर्साेवा या टप्प्याला रेल्वे बोर्डाने आज हिरवा कंदिल दिला. गेल्या तीन महिन्यांपासून ही फाईल रेल्वे बोर्डाकडे पडून होती. काल खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अधिकार्‍यांना भेटुन मुंबई मेट्रो रेल्वेला आवश्यक असलेली मंजुरी मिळवली. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळाली की मुंबई मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.

मेट्रो रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांसाठी अत्यानुधिक सोयी सुविधा असणार आहेत. यात प्रवाशांसाठी फूड स्टॉल्स, तसंच एटीएमची व्यवस्था असणार आहे. मुंबईतल्या सर्व 12 मेट्रो रेल्वे स्टेशनवर ही व्यवस्था असेल

मुंबई मेट्रो वनची वैशिष्ट्यं

  • वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणार
  • मेट्रो रेल्वेची लांबी 11 किलोमीटर
  • मेट्रो मार्गावर 12 स्टेशन्स
  • वातानुकूलित रेल्वे प्रवास
  • मेट्रो रेल्वे प्रकल्पाची किंमत 2356 कोटी
  • पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक दुवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2014 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close