S M L

अखेर 'मुंबई मेट्रो' उद्यापासून धावणार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 7, 2014 08:31 PM IST

अखेर 'मुंबई मेट्रो' उद्यापासून धावणार

07  जून :  राज्यातील पहिली मेट्रो कधी सुरू होणार, याची उत्सुकता संपली असून उद्यापासून (रविवार) ‘मुंबई मेट्रो‘ मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. बहुप्रतिक्षित ‘मुंबई मेट्रो‘चा  घाटकोपर ते वर्सोवा असा पहिला टप्पा असेल.

याआधी दहा वेळा डेडलाईन चुकवुन अखेर मुंबईकर मेट्रोनं प्रवास करु शकतील. या प्रकल्पासाठी साडेचार हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे मेट्रोचे दर किती असतील याबद्दल उत्सुकता आहे. वर्साेवा- अंधेरी- घाटकोपर असा हा मेट्रोचा मार्ग आहे. मात्र अद्याप मेट्रोचे वेळापत्रक व तिकीट दर जाहीर केले गेले नाहीत.

मेट्रो रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा असणार आहेत. यात प्रवाशांसाठी फूड स्टॉल्स, तसंच एटीएमची व्यवस्था असणार आहे. मुंबईतल्या सर्व 12 मेट्रो रेल्वे स्टेशनवर ही व्यवस्था असणार आहेत.

मुंबई मेट्रो वनची वैशिष्ट्यं

 • चार डबे असणार
 • पहाटे 5.30 ते रात्री 12 धावणार मेट्रो
 • एका मेट्रोची क्षमता 1500 प्रवासी
 • एका डब्यात साधारण 335 प्रवासी बसू शकतात
 • दर 4 मिनिटाला मेट्रोची एक फेरी

मुंबई मेट्रो

 • वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणार
 • मेट्रो रेल्वेची लांबी 11 किलोमीटर
 • मेट्रो मार्गावर 12 स्टेशन्स
 • वातानुकूलित रेल्वे प्रवास
 • मेट्रो रेल्वे प्रकल्पाची किंमत 2356 कोटी
 • पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक दुवा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2014 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close