S M L

मिलेनर हीट'जय हो'चंही रीमिक्स

15 एप्रिल ए. आर. रेहमानचं 'जय हो' हे मिलेनर हीट गाणं आता रिमिक्सच्या बीट्सवर थिरकायला लावणार आहे. या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि आंतरराष्ट्रीय मान्यताही प्राप्त झाली. आता या गाण्याची प्रसिद्धी आणखीणच वाढेल की काय अशी उत्सुकता वाटतेय.अमेरिकन पॉप गर्ल ग्रुप पुसी कॅट डॉल्सनं रेहमानच्या 'जय हो'चं रिमिक्स केलं आहे. गाण्याचं रीमिक्स बनवण्याअधी त्यांनी त्याचा सिनेमाही पाहिला. सिनेमा खूप जवळचा वाटला. यावर काम करणारा प्रत्येक जण या गाण्याशी जोडला गेला. त्यातून नवा अर्थही समजला असं या बँडचं म्हणणं होतं. सिनेमा पाहिल्यामुळे त्यांना गाण्याशी एकरूप होण्यास मदत झाली . 'आमचं शूटिंग ग्रेट झालं. यात काम करणार्‍या सगळ्यांचीच एक प्रकारे गुंतवणूक होती.' असं एका बँड मेम्बरचं म्हणणं होतं. 'जय हो' हे गाणं फास्ट असून त्याच्या रीमिक्सलाही आणखीनच फास्ट चाल लावली आहे. या रीमिक्सचे व्हिडियोही बनवण्यात आले आहेत. व्हिडियोमध्ये ए. आर. रेहमानच्या 'जय हो' गाण्याच्या डान्स स्टेप्सचा वापर केला आहे. या स्टेप्सवर स्वत: पुसी डॉल्स डान्स करताना दिसणार आहेत. रीमिक्स बनवताना कष्ट घेतले पण मूळ गाण्याचा आनंदही घेता आला असं या बँडचं म्हणणं आहे. हे रीमिक्स कितीही मेहनत घेऊन बनवलं असलं तरी, भारतीय जनतेच्या मनात ए. आर. रेहमानच्या 'जय हो' या मूळ गाण्याची जागा हे रीमिक्स घेऊ शकेल का, ते लवकरच समजेल .

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2009 10:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2009 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close