S M L

कसाबला हवाय पाकिस्तानी वकील

15 एप्रिल मुंबई हल्ल्याच्या खटल्याच्या पहिल्याच दिवशी या खटल्यानं आणखी एक नाट्यमय वळण घेतलं आहे. कसाबनं आता पुन्हा पाकिस्तानी वकिलाची मागणी केली आहे. त्याच्या या मागणीवर गुरूवारी न्यायमूर्ती तहलियानी योग्य निर्णय देणार आहेत. वकील अंजली वाघमारे यांनी वकिली आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याकडून कसाबची केस काढून घेतली आहे. अंजली वाघमारे या एकाचवेळी साक्षीदार आणि आरोपीचं वकीलपत्र घेतल्याचा दावा ऍड. के.बी.एन.लामा यांनी केला. त्यामुळे अंजली वाघमारेंकडून कसाबचं वकीलपत्र काढून घेण्यात आलं. त्यानंतर झालेल्या सुनावणीच्या वेळी कसाबने त्याला पुन्हा एकदा पाकिस्तानी वकील हवा असल्याची मागणी केली आहे.कसाबच्या मागणीला उत्तर देताना न्यायमूर्ती तहिलीयानी म्हणाले, ' पाकिस्तानी वकील जर कसाबची बाजू मांडणार असेल तर त्याला इंडियन बार कौन्सिलची परवानगी घ्यावी लागेल. तसंही जर पाकला करायचं नसेल तर पाकिस्तान कसाबसाठी भारतीय वकील नियुक्त करू शकेल. पण जर पाक सरकारच कसाबच्या मागणीला उत्तर देत नसेल तर कसाबला भारतीय चौकटीत राहून लिगल एडद्वारे वकील निवडावा लागेल.' यावेळी न्या. तहलियानी यांनी गुरुवारी होत असलेल्या सुनावणीत बार काऊन्सिलच्या लिगल एडच्या वकिलांची यादी सादर करावी असंही सांगितलं.कसाबच्या मागणीविषयी सांगताना, ' कसाबने या पूर्वीही त्याला पाकिस्तानी वकील हवा असल्याची मागणी केली होती. त्यासंदर्भातलं पत्र आम्ही पाकिस्तान सरकारला पाठवलं आहे. हे पत्र पाठवून बरेच दिवस झाले आहेत. तरीही आम्हाला अजून त्यांच्याकडून तसा काहीच रिप्लाय आला नाही, ' असं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2009 12:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2009 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close