S M L

दरवाढीचा वाद कोर्टात सोडवणार - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Jun 8, 2014 01:22 PM IST

दरवाढीचा वाद कोर्टात सोडवणार - मुख्यमंत्री

08  जून :  दीर्घप्रतिक्षेनंतर अखेर मुंबई मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. आणि लोकांनी या सेवेचा लाभ घ्यायला सुरुवातही केली आहे. पण पहिल्याच दिवशी मेट्रो तांत्रिक बिघाडामुळे अर्धा तास बंद होती. आता वर्सोवा ते घाटकोपर व्हाया अंधेरी हा प्रवास मुंबईकरांना अवघ्या 21 मिनिटांमध्ये करता येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो सेवेचं उद्घाटन झालं. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोने प्रवास करून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मेट्रोच्या तिकीटाच्या दराचा वाद सध्या कोर्टात असल्याचं स्पष्ट केलं.

मेट्रो प्रकल्प पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या, पण अखेर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. तिकीट दरावरून सुरू असलेले मतभेद रिलायन्सशी चर्चा करून सोडवण्यात येतील. करारामध्ये दिलेल्या बाबी पाळायलाच हव्यात. कोर्टामध्ये दराच्या वादावरुन दावा दाखल केला आहे त्यावर उद्या सुनावणी होईल असंही ते म्हणाले.  काल मेट्रोच्या श्रेयावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण चांगलंच तापलं होतं. हा प्रकल्प एनडीएने आणल्याचा दावा भाजपने केला आहे. तर भाजप रिलायन्सला भाववाढीसाठी मदत करत असल्याचा मुख्यमंत्र्यांनी आरोप केला.

2006 रोजी मुंबई मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली होती. आठ वर्षांनंतर मुंबई मेट्रो मुंबईकरांसाठी सुरू झाली आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात मेट्रोचे काम करणं हे एक आव्हान होतं. उशीर झाला असला तरी मेट्रो सुरु झाल्यानं मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मुंबई मेट्रोच्या निमित्ताने आपण खर्‍या अर्थाने 21व्या शतकात प्रवेश करतोय असं ही ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकल्पाचं नाव मुंबई मेट्रो असेच असणार आहे.असही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2014 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close