S M L

डॉ. विजया पाटील यांचं अपघाती निधन

15 एप्रिल, लोणावळागणेश वायकर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि बॉम्बे हॉस्पिटलच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर विजया पाटील यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे हायवेवर रस्त्यावरच्या डिव्हायडरला त्यांची सॅन्ट्रो गाडी आदळल्यानं हा अपघात झालाय. त्या कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला चालल्या होत्या. भरधाव वेगात असणा-या डॉ. पाटील यांच्या गाडीचा टायर फुटुन ती डिवायडरला आदळली. या अपघातात डॉ. विजया पाटील आणि त्यांच्या सहका-यांचं जागीच निधन झालं आहे. शवविच्छेदनासाठी डॉ. पाटील यांचा मृतदेह खंडाळा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.अपघातस्थळी दिलीप वळसे-पाटील यांनी तातडीने भेट दिली. ' डॉ. विजया पाटील यांच्यासारखी शेतकरी कुटुंबातली मुलगी डॉक्टर होऊन पुढे राजकारणात स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करते ही गोष्ट गौरवास्पद आहे. डॉ. पाटील यांच्या जाण्याने पक्षाचं नुकसान झालं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोविंदराव आदिक यांनी आयबीएन-लोकमतला दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2009 12:12 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2009 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close