S M L

पोलिस अधिकार्‍याच्या निरोप समारंभाची रेव्ह पार्टी?

Samruddha Bhambure | Updated On: Jun 8, 2014 08:09 PM IST

पोलिस अधिकार्‍याच्या निरोप समारंभाची रेव्ह पार्टी?

08 जून : रायगड जिल्हातील खालापूर इथे एका या फार्महाऊसवर पोलिस अधिकार्‍याच्या निरोप समारंभाची रेव्ह पार्टीचं अयोजन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायगड पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकून 12 मुलीसह 17जणांना ताब्यात घेतलं आहे.

खालापूरजवळच्या लेक पॅलेस इथे नवी मुंबई झोन-2चे डी. सी. पी सुरेश पवार यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने या फार्महाऊसवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती डीवायएसपींना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी खालापूर आणि कर्जत पोलिसांच्या मदतीनं काल रात्री उशीरा छापा टाकून ही पार्टी उधळून लावली. त्यावेळी नाचणार्‍या मुलींवर लोक दारु पिऊन पैे उधळत असल्याचं दिसून आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2014 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close