S M L

फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये राफेल नदाल आणि जोकोविच आमनेसामने

Samruddha Bhambure | Updated On: Jun 12, 2014 05:53 PM IST

फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये राफेल नदाल आणि जोकोविच आमनेसामने

08 जून :  आज फ्रेंच ओपनच्या फायनलचा थरार बघायला मिळणार आहे. पुरुष एकेरीत वर्ल्ड नंबर वन आणि तब्बल आठ वेळा फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावणार्‍या राफेल नदालला आव्हान आहे ते वर्ल्ड नंबर 2 नोवाक जॉकोविकचं. शुक्रवारी झालेल्या दुसर्‍या सेमीफायनलमध्ये नदालनं वर्ल्ड नंबर 7 अँडी मरेचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला आणि फ्रेंच ओपनच्या सलग पाचव्या फायनलमध्ये धडक मारलीये.

संपूर्ण मॅचमध्ये नदालनं वर्चस्व राखलं आणि मरेचा 6-3, 6-2, 6-1 असा सहज पराभव केला. 2009 वगळता 2005 पासून नदालनं आठ वेळा फ्रेंच ओपनच्या जेतेपदाला गवसणी घातलीये... त्यामुळे आता फायनलमध्ये जॉकोविकला पराभवाचा धक्का देत हा क्ले कोर्टचा बादशहा विक्रमी नवव्यांदा फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2014 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close