S M L

कराची एअरपोर्टवरच्या दहशतवादी हल्ल्यात 10 अतिरेक्यांसह 28 जण ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 9, 2014 06:56 PM IST

कराची एअरपोर्टवरच्या दहशतवादी हल्ल्यात 10 अतिरेक्यांसह 28 जण ठार

terror

09  जून :  पाकिस्तानातल्या कराची आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर काल रात्री अतिरेक्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात 10 अतिरेक्यांसह 28 जण ठार झालेत. तेहेरिक- ए- तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. गेल्या वर्षी अमेरिकी ड्रोनच्या हल्ल्यात हकीमुल्ला मेहसुद ठार झाल्याचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचं तालिबाननं म्हटलं आहे.

तब्बल 6 तास दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू होती. पहाटे चकमक थांबल्यावर सकाळी दहाच्या सुमाराला पुन्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पण, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानात झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो आहे. दहशतवादी लष्करी गणवेषात आले होते. त्यांच्याकडे खोटी ओळखपत्रही होती. त्यापैकी एका हल्लेखोराला अटकही करण्यात आली आहे.

 सुरक्षा दलानं कराची एअरपोर्टचा ताबा एअरपोर्ट अथॉरिटीकडे सुपूर्द केला आहे पण, अजून कुठल्याही फ्लाईट्स सुरू करण्यात आलेल्या नाही. लवकरच या विमानतळावरील सेवा पूर्ववत करण्यात येईल असे पाकिस्तानमधील सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2014 06:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close