S M L

कोल्हापूरच्या टोलप्रकरणी शिवसेनेचे दोन आमदार निलंबित

Samruddha Bhambure | Updated On: Jun 9, 2014 09:23 PM IST

कोल्हापूरच्या टोलप्रकरणी शिवसेनेचे दोन आमदार निलंबित

kolhapur toll

09  जून : कोल्हापूर टोल बंद करा या मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानसभेत गोंधळ घातला. कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि सुजीत मिंचेकर यांना निलंबित करण्यात आलं आहे.

कोल्हापूर टोल बंद करा अशी या दोन्ही आमदारांनी मागणी केली होती. पण ही मागणी मान्य न झाल्याने त्यांनी विधानसभेत गोंधळ घालत घोषणाबाजी केली. त्याशिवाय त्यांनी राजदंड पळवण्याचा ही प्रयत्न केला. त्यामुळे या दोघांवर अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या गोंधळामुळे विधानसभा तीनदा तहकूब करण्यात आली. निलंबनाचे आदेश दिल्यानंतरही क्षीरसागर आणि मिंचेकर सभागृहात दाखल झाले आणि सभागृहाच्या हौदात त्यांनी लोटांगण घातलं. त्यामुळे त्यांना मार्शलकरवी बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झालं.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये टोलविरोधी कृती समितीने आज महामोर्चा काढला. या महामोर्चाला कोल्हापूरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2014 04:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close