S M L

वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांचा काँग्रेसला राजीनामा

Samruddha Bhambure | Updated On: Jun 9, 2014 07:26 PM IST

वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांचा काँग्रेसला राजीनामा

09  जून : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवांनतर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये नाराजांची संख्या वाढत असून त्यातील अनेक जण भाजपच्या वाटेवर आहेत. काँग्रेसचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी आज पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे.

दत्ता मेघे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला आहे. पाच जुलै रोजी वर्धेत दत्ता मेघे त्यांचे मुलगे सागर आणि समीर सुद्धा भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. मेघे यांच्या सोबत हजारो कार्यकर्तेही भाजपमध्ये जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाली, असं त्यांचं म्हणणं आहे. दत्ता मेघे यांच्याबरोबर त्यांचे समर्थक आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये जाणार असल्याने काँग्रेसला हा मोठा फटका मानला जातं आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याशी त्यांची जवळीक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2014 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close