S M L

राज्यातले 44 टोलनाके राज्यसरकारकडून बंद - अजित पवार

Samruddha Bhambure | Updated On: Jun 9, 2014 09:15 PM IST

राज्यातले 44 टोलनाके राज्यसरकारकडून बंद - अजित पवार

09 जून :  मनसेच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं 67 टोलनाके बंद केले होते. आज पुन्हा 44 टोलनाके बंद करण्याची घोषणा करण्यात आली. यातली 34 टोलनाके सार्वजनिक बांधकाम विभागाचे तर 10 टोलनाके MSRDCचे आहेत. तसंच ST बसला आता कुठल्याही टोल नाक्यावर टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

 त्याचबरोबर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे टोलदर कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट घेणार आहे. बंद केलेल्या टोलनाक्यांचा 306 कोटींचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय. तर राज्यातले 42 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तर सरकारनं जे टोल नाके बंद केलेत, त्यांचं श्रेय आम्हाला जातं, अशी मनसेची भूमिका आहे.

कोल्हापूरमध्ये टोलविरोधी कृती समितीनं भव्य मोर्चा काढला. सर्वपक्षीय नेते या मोर्चायात सहभागी झालेत. कृती समितीचा हा महामोर्चा शहरातल्या गांधी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. त्यामुळे शहरासह आता टोलनाक्यांवरचा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. दरम्यान, आयआरबी कंपनीनं येत्या 16 जूनपूर्वी आपल्याला पोलीस बंदोबस्त पुरवावा अशा मागणीची नोटीस जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हापोलीसप्रमुख आणि मनपा आयुक्तांना दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2014 09:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close