S M L

कराची एअरपोर्टवर 48 तासांत दुसरा अतिरेकी हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Jun 10, 2014 04:27 PM IST

कराची एअरपोर्टवर 48 तासांत दुसरा अतिरेकी हल्ला

10 जून :  पाकिस्तानमधील कराची विमानतळाजवळ मंगळवारी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला आहे. कराची विमानतळावर रविवारी रात्री अतिरेक्यांनी हल्ला चढवला होता आणि 48 तासांत पुन्हा एकदा अतिरेक्यांनी हल्ला केला आहे.

कराचीतल्या जिना विमानतळावर एअरपोर्ट सेक्युरिटी फोर्स कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. विमानतळावरील कमीतकमी दोन ठिकाणांहून जोरदार चकमकींचे आवाज येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पण ASF कॅम्पवरुन 3 ते 4 दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झालेत. तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं या ही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याआधी दहशतवाद्यांनी कॅम्पवरच्या लेडीज हॉस्टेलमध्येही घुसण्याचा प्रयत्न केला होता. 2 दहशतवाद्यांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नासून परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे विमान उडडाणं सुरु करण्यात आली आहेत.

दरम्यान, गेल्या 48 तासांता कराची विमानतळावरील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. रविवारी रात्री तेहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी विमानतळावर हल्ला केला होता. सुमारे सहा तासांच्या चकमकीनंतर या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणांना यश आले होते. या हल्यात 10  दहशतवाद्यांसह 18  जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला एक दिवस झाला असतानाच मंगळवारी दुपारी पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2014 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close