S M L

गारपीटग्रस्तांचं व्याज माफ, 1 लाखांपर्यंत विनाव्याज कर्ज

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2014 10:17 PM IST

89harshvardhan_patil11 जून : लोकसभेत दारुण पराभवानंतर आघाडी सरकारने विधानसभेसाठी कंबर कसलीय. आघाडी सरकारने बळीराजाला खूष करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने विधिमंडाळात घोषणांचा पाऊस पाडला.

 

संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (बुधवारी) विधानसभेत घोषणा केल्या असून यात शेतकर्‍यांसाठी भरघोस आश्वासनं देण्यात आलीय. पीक कर्जाचा आराखडा 40 हजार कोटींचा होता. तो 5 हजार कोटींनी वाढवण्यात आला आहेत.

 

तसंच गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्जाचं 283 कोटी रुपयांचं व्याजही माफ करण्यात आलंय. 1 लाख रुपयांचं कर्ज हे विनाव्याज, 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी 2 टक्के व्याज अशा घोषणा सरकारने केल्या आहेत. त्यासोबतच विदर्भातल्या तीन बँकांचं पुनरुज्जीवन होणार आहे आणि 9 भूविकास बँकांचं पुनरुज्जीवन होणार आहे.

विधानसभेत महत्वाच्या घोषणा

 • पीक कर्जाचा आराखडा 40 हजार कोटींचा
 • 5 हजार कोटींनी वाढ
 • 1 लाख रुपयांच्या पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याज
 • 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी 2 टक्के व्याज
 • नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा बँकांना 319 कोटींचं अनुदान
 • बँकांना परवाना मिळवून देण्यासाठी भाग भांडवलासाठी अनुदान
 • विदर्भातले 6 सहकारी साखर कारखाने विकले जाणार नाहीत, ते सहकारातच राहणार
 • आणि त्या संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
 • 9 भूविकास बँकांचं पुनरूज्जीवन होणार
 • इतर भूविकास बँकांना स्वेच्छा निवृत्ती लागू होणार
 • शेतकर्‍यांच्या थकबाकी 1 लाख 52 हजार शेतकर्‍यांच्या 432 कोटींच्या थकबाकी
 • 6 टक्के सेटलमेंट योजना लागू, शेतकर्‍यांच्या नावावर सातबारा करणार
 • शेतकर्‍यांना शासकीय योजनेतली अवजारं खुल्या बाजारातून घेण्यास मुभा
 • धान खरेदीची मुदत 30 जून पर्यंत वाढवली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2014 10:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close