S M L

विजयी सलामीसाठी ब्राझील-क्रोएशिया आमनेसामने

Sachin Salve | Updated On: Jun 12, 2014 09:54 PM IST

विजयी सलामीसाठी ब्राझील-क्रोएशिया आमनेसामने

12 जून : वर्ल्ड कपची पहिली मॅच रंगेल ती ब्राझील आणि क्रोएशिया दरम्यान...त्यामुळे आपल्या आक्रमक गुणांसाठी प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही टीम्समध्ये कोण बाजी मारत वर्ल्ड कप कॅम्पेनची विजयी सुरुवात करतंय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच ब्राझीलच्या वर्ल्ड कप कॅम्पेनला धक्का बसला आहे. मंगळवारी कोच ल्युई फिलीप स्कोलारींच्या भाच्याचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलच्या स्ट्रॅटेजीचे मास्टरमाईंट स्कोलारी आपल्या दुखाःवर मात करत, देशाला प्राधान्य देत आता पहिल्या मॅचसाठी आणि त्यांच्या सहाव्या वर्ल्ड कपसाठी सज्ज झाले आहेत. 12 वर्षांपूर्वी याच ब्राझीलच्या टीमला स्कोलारींनी जेतेपद पटकावून दिलं होतं आणि तोच चमत्कार करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे.

ब्राझीलचा खेळाडू डानी ऍल्वेस म्हणतो, 'वर्ल्ड कपची पहिली मॅच नेहमीच महत्वाची असते. खूप कठीण असते. मला वाटतं चांगली सुरुवात मिळणं खूप महत्वाचं आहे कारण सुरुवात चांगली झाली की, समोरच्या टीम्सना एक इशारा जातो. फायनल एवढीच ही मॅच महत्वाची आहे.'

ब्राझीलनं वर्ल्ड कपची पहिली मॅच कधीच गमावली नाहीये. त्यामुळे साओ पाओलोला रंगणार्‍या क्रोएशिया विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्येही तेच फेव्हरेट असतील. टीमची सराव शिबिरं ही सध्या गुप्तपणे घेतली जात आहेत. त्यामुळे कॉन्फेडरेशन कपमध्ये स्पेनचा धुव्वा उडवणारीच टीम स्कोलारी राखतील ही दाट शक्यता आहे. न्येमार, फ्रेड, हल्क आणि ऑस्कर या ब्राझीलच्या तुफान ऍटॅकिंग फॉरवर्ड आणि मिडफिल्डच्या फळीकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

तर ब्राझीलचा खेळाडू ल्युई गुस्ताओ म्हणतो,' न्येमार आहेच पण नसला तरी टीम तितकाच चांगला खेळ करेल. आमच्याकडे 23 उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत. आमच्या स्ट्रॅटेजीमध्ये थोडे बदल होतील. पण आम्ही उत्तमच खेळ करू'

तर 2006 मध्ये क्रोएशियाचं प्रतिनिधित्व करणार्‍या निको कोव्हॅकच्या टीमची मदार असेल ती ल्युका मॉड्रिक आणि इव्हान रॅकिटीकवर... त्यामुळे ब्राझिलियन साम्बापुढे क्रोएशियाचा टीकाव लागतोय का हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2014 09:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close