S M L

ठाणे विभाजनच्या निर्णयावर उद्या शिक्कामोर्तब ?

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2014 01:09 PM IST

Image img_162862_thane35_240x180.jpg12 जून : सध्याच्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव उद्या (गुरुवारी) राज्य मंत्रिमंडळासमोर चर्चेला येणार आहे. जास्त लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या सध्याच्या ठाणे जिल्ह्यावर प्रशासनाच्या दृष्टीने अडचणी येत आहेत.

त्यामुळे ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून आदिवासीबहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा सरकारचा विचार आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी तो नंतर विधिमंडळात जाहीर करण्यात येईल.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिलीय. ठाणे जिल्ह्याच्या त्रिभाजनाची मागणी होती. पण सरकार विभाजन करण्याच्या विचारात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2014 10:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close