S M L

सौरव गांगुलीची हकालपट्टी

17 एप्रिलआयपीएलचा महासोहळा सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन सौरव गांगुलीला धक्का बसला आहे. त्याची टीमच्या कॅप्टनपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता सौरवच्या जागी ब्रँडन मॅक्युलमची कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅप्टनपदावर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. पण टीमच्या या निर्णयातही एक मेख आहे. सुरुवातीच्या मॅचेसमध्ये मॅक्युलम टीमचं नेतृत्व करेल असं आता टीमकडून सांगितलं जातंय. एकापेक्षा जास्त कॅप्टन नेमण्याच्या संकल्पनेवर मात्र सध्या टीमने मौन बाळगलं आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात सौरव गांगुलीने कोलकाता टीमचं नेतृत्व केलं होतं. पण यावर्षी नाईट रायडर्सचे कोच जॉन बुकानन आणि स्वत: गांगुली यांच्यात कप्तानीवरून मतभेद झाले होते आणि नंतरचा महिनाभर हा वाद चिघळतच गेला. एकापेक्षा जास्त कॅप्टन नेमण्याची संकल्पना बुकानन यांनी मांडली होती. त्यावरही अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. अखेर टीमच्या कप्तानाची घोषणा दक्षिण आफ्रिकेतच करण्यात येईल असं टीमचा मालक शाहरुख खानने स्पष्ट केलं. त्यामुळे अखेर कप्तानपदी ब्रँडन मॅक्युलमची निवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामात मॅक्युलमने कोलकाता टीमला दणदणीत सुरुवात करून देताना टीमच्या पहिल्याच मॅचमध्ये 73 बॉल्समध्ये 158 रन्स केले होते. पण त्यानंतर टीमची कामगिरी घसरत गेली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2009 08:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2009 08:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close