S M L

घाटकोपर ते ठाणेही मेट्रो धावणार

Sachin Salve | Updated On: Jun 14, 2014 07:41 PM IST

mumbai metro14 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खूश करण्यासाठी राज्य सरकारने घोषणांचा धडका लावलाय. मुंबईनंतर आता ठाण्यातही मेट्रो प्रकल्प उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली आहे. घाटकोपर ते ठाणे असा 31 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो धावणार आहे.

 

हाच मार्ग भविष्यात भिवंडी मार्गे कल्याण असा वाढणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. घाटकोपर ते ठाणे दरम्यान एकूण 29 स्थानकं असणार आहेत तर यासाठी एकूण खर्च 22 हजार कोटी रुपये असणार आहे. मुंबई मेट्रो मागील आठवड्यात सुरू करण्यात आली.

 

वर्सोवा ते घाटकोपर अशा 11 किलोमीटरच्या अंतरावर मेट्रो धावत आहे. तर घाटकोपर ते ठाणे असा 31 किलोमीटरची मेट्रोची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबई मेट्रोसाठी तब्बल आठ वर्षांचा कालावधी लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2014 07:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close