S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूतान दौरा

Samruddha Bhambure | Updated On: Jun 15, 2014 12:21 PM IST

 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूतान दौरा

15  जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या भूतान दौर्‍यावर गेले आहेत. त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. आज सकाळी साडे अकराच्या सुमाराला मोदी भूतानची राजधानी थिम्फूत पोहोचले. एअरपोर्टवर भूतानच्या अधिकार्‍यांनी त्यांचं स्वागत केलं. मोदी भूतानचे राजे, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांची भेट घेणारेत. या दोन दिवसांच्या दौर्‍यामध्ये आर्थिक विकास आणि ऊर्जा या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या दौर्‍यामुळे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचा अंदाज येईल.

आर्थिक विकासाच्या मुद्द्यावर मोदींची भूतानचे पंतप्रधान शेअरिंग टोग्बे यांच्याशी चर्चा होईल. भारत हा भूतानचा औद्योगिक सहकारी आहे. भूतान हा जलऊर्जेचा मोठा स्रोत आहे. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर वीज प्राप्त होते. भारताने भूतानच्या तीन जलऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. चीनलाही भूतानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहे. त्यामुळे चीन-भूतानच्या व्यवहाराकडेही भारताचं लक्ष आहे. मोदींसोबत परराष्ट्र सचिव सुजाता सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील या दौर्‍यात सहभागी आहेत.

दरम्यान, थिम्फूचं विमानतळ तुलनेनं छोटं असल्यामुळे पंतप्रधानांचं मोठं विमान तिथं उतरू शकत नाही..म्हणून मोदींनी वायू सेनेच्या छोट्या विमानानं प्रवास केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2014 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close