S M L

विधानसभेसाठी काँग्रेसकडून जास्त जागा मागणार - राष्ट्रवादी काँग्रेस

Samruddha Bhambure | Updated On: Jun 15, 2014 06:47 PM IST

sharad pawar 15th

15  जून :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दबावतंत्राला सुरुवात केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईत तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा केली. त्यात काँग्रेसकडे जास्त जागा मागण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला राष्ट्रवादीचे नवाब मलिक जागावाटपाबाबत खुद्द शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे काँग्रेसशी चर्चा करणार आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या पराभवामधून सावरण्याआधीच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरही राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे. एलबीटी, मराठा आरक्षण आणि मुस्लीम आरक्षणावर त्वरित निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2014 06:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close