S M L

'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' ब्रेक के बाद!

Samruddha Bhambure | Updated On: Jun 15, 2014 08:40 PM IST

'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' ब्रेक के बाद!

15  जून :  कपिल शर्माचा प्रसिद्ध शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' च्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सप्टेंबरपासून 'कलर्स'वरचा हा शो बंद होणार आहे. शोचा लाडका होस्ट आणि निर्माता कपिल शर्माने रविवारी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली असून नवीन कॅरेक्टर आणि सेटसह हा शो पुन्हा सुरू करू असं कपिलने म्हटलं आहे.

लवकरच कपिल यशराज बॅनरच्या 'बँक चोर' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या शुटिंगमध्ये सध्या व्यस्त असल्यामुळे सध्या त्याला 'कॉमेडी नाइट्स'ला पुरेसा वेळ देता येत नाहीये त्यामुळे तुर्तास हा शो बंद होत असल्याची माहिती मिळते.

कॉमेडी नाइट्समध्ये कपिल, दादी, बुआ, पलख अशा अनेक व्यक्तिरेखांना प्रक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या शोच्या वाढत्या टीआरपीनं तर 'कौन बनेगा करोडपती'चाही रेकॉर्ड ब्रेक केला होता. माधुरी, सलमान खान, अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, सोनल कपूर, आलिया भटपासून ते अगदी जितेंद्र , धर्मेंद्र, अमिताभसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी 'कॉमेडी नाइट्स' मध्ये हजेरी लावली. एवढचं नाही तर सानिया मिर्झा, विरेंद्र सेहवाग, कपिल देव सारखे खेळाडूंनीही 'कॉमेडी नाईट्स'मध्ये हजेरी लावली होती. मात्र आता हा शो आपल्या सर्वचं चाहत्यांना अलविदा करण्याच्या तयारीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2014 06:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close